Advertisement

मंत्रीमंडळात महिलांना स्थान नसणं धक्कादायक : सुप्रिया सुळे

मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. या प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे

मंत्रीमंडळात महिलांना स्थान नसणं धक्कादायक : सुप्रिया सुळे
SHARES

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet Expansion) अखेर आज झाला आहे. यामध्ये एकूण 18 जणांनी मंत्रीपडाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 9 तर शिंदे गटाच्या 9 जणांना मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही.

याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली आहे. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू, एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. तसेच हे खेदजनक असल्याचे सुळे यांनी म्हटलंय.

पंतप्रधानांचं नाव घेत टीका

स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार अजून बाकी

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केवळ 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे, हा मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार नसला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल, महिलांनाही योग्य स्थान दिले जाईल.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यावर विरोधकांनी टीका तर केलीच. पण भाजपच्या काही नेत्यांनी देखील नाराजी वर्तवली आहे.

शपथविधी सोहळ्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. राठोड यांनी शपथ घेतल्याच्या पुढल्याच मिनीटाला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली.

“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. त्यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.



हेही वाचा

बुलेट ट्रेनचा 25% खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

बुधवारपासून पावसाळी विधीमंडळ अधिवेशनाला सुरुवात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा