Advertisement

'हवा बदल, हवाय विकास'


'हवा बदल, हवाय विकास'
SHARES

मुंबई -  हवा बदल, हवाय विकास... ही प्रत्येक मुंबईकराची भावना ओळखत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीचा जाहीरनामा गुरुवारी प्रसिद्ध केला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईकरांच्या मूलभूत तसेच शहराच्या विकासात्मक गरजांचा विचार करून पक्षातर्फे जाहीरनामा बनवण्यात आला आहे. याअंतर्गत मुंबईकरांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत जाहीरनाम्यात भर देण्यात आला असून, प्रत्येक मुंबईकरांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी आहे आणि ती निभावण्यात येणार आहे असा निर्धार सचिन अहिर यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादीच मुंबईचा विकास करू शकते त्यामुळे आपले बहुमूल्य मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले. 

काय आहे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात 

  • प्रत्येक कुटुंबाला 700 लीटर शुद्ध आणि स्वच्छ पाणी मोफत देण्यात येणार
  • मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची क्षमता वाढवण्यात येणार
  • बेस्ट विद्युत ग्राहकाला 100 मीटर युनिट्स मोफत करण्याबाबत योजना
  • बेस्ट बसेसचे किमान भाडे 5 रुपये तर जास्त भाडे 20 रुपये करण्याचा प्रयत्न केला जाणार
  • मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांतील मुख्य रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण 
  • नवीन पार्किंग पॉलिसी बनवणार, भविष्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत
  • निरामय आरोग्य योजनेअंतर्गत वर्षाला 101 रुपये भरून शासकीय आणि खासगी रुग्णालयात आरोग्य सेवा योजना दिली जाणार
  • मुंबईकरांचा आरोग्यविमा उतरवून त्याचे प्रिमियम मनपा आपल्या तिजोरीतून भरेल
  • मुंबईतील डंपिंग ग्राऊंडना चारही बाजूने कुंपण घालून सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे 24 तास देखरेख करणार
  • एसएमएस, व्हॉट्सअपद्वारे 'कचरा हटाव मोहीम' योजना राबवणार
  • झोपडपट्टीवासीयांना सोयी-सुविधा दिल्या जाणार, झोपडपट्टीवासीयांचे जीवन सुखकर करणार
  • महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून व्यवसाय शिक्षण आणि तंत्रशिक्षणयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देणार
  • मुंबईभर प्रत्येक वॉर्डात मोफत वाय-फायची सुविधा देणार, आपत्कालीन व्यवस्थेसाठी वॉर्डनिहाय 24 तास फ्री कॉल सेंटर्स उभारणार
  • महिला बचत गट आणि सहकारी संस्थांच्या सहकार्याने मोबाईल व्हेंडर्स मार्फत घरगुती आणि महिलांच्या उपयोगी वस्तूंची वितरण साखळी निर्माण करणार
  • बचत गटांसाठी निधी आणि जागा उपलब्ध करुन देणार
  • समुद्र किनाऱ्याजवळील स्थानिक भूमिपूत्रांची लाईफ गार्ड म्हणून नियुक्ती करणार
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा