Advertisement

यापुढील भरती आॅफलाइन पद्धतीने, मुख्यमंत्र्यांचं रोहित पवार यांना आश्वासन

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी यापुढील भरती आॅफलाइन पद्धतीने करण्याचं आश्वासन दिलं.

यापुढील भरती आॅफलाइन पद्धतीने, मुख्यमंत्र्यांचं रोहित पवार यांना आश्वासन
SHARES

महाविकास आघाडी सरकारने मेगा भरतीची (Mega recruitment) तयारी सुरू केली असून ही भरती प्रक्रिया महाआयटी (mahait) विभागाच्या माध्यमातून एका खासगी एजन्सीद्वारे राबवण्यात येणार आहे. त्यावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Ncp mla rohit pawar) यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी यापुढील भरती आॅफलाइन पद्धतीने करण्याचं आश्वासन दिलं. 

हेही वाचा - सरकारच्या मेगाभरतीला रोहित पवारांचा आक्षेप

येत्या २० एप्रिलपासून मेगाभरतीच्या (maharashtra government job recruitment) प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. या मेगाभरतीसाठी (Mega recruitment) आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून महापरीक्षा (mahapariksha) पोर्टल ऐवजी ही परीक्षा खासगी एजन्सीमार्फत घेण्यात येणार आहे. राज्यात शासकीय कर्मचार्‍यांची मोठी कमतरता निर्माण झाली असून सद्यस्थितीत राज्यात तब्बल २ लाख शासकीय पदे रिक्त आहेत. गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास अशा महत्वाच्या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्त जागा आहेत. या रिक्त पदांपैकी १ लाख ६ हजारांची आरक्षण पडताळणी देखील पूर्ण झाली आहे. ही पदे भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्त करुन २० एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात करण्याचे निर्देश राज्य सरकारने महाआयटीला (mahait portal) दिले आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासनाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याद्वारे महाभरतीसंबंधी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. 

परंतु ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेऊन राज्यातील तरुणांनी मला आणि इतर आमदारांना, नेत्यांना भेटून ही भरती खासगी एजन्सीऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली होती. ही भरती महाआयटी ऐवजी 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'च्या माध्यमातून व्हावी, यावर तरूणांचा भर होता, असंही रोहित पवार (rohit pawar) यांनी सांगितलं.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या पारड्यात राज्यसभेची चौथी जागा

त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याप्रश्नी भेट घेतली असता, नोकरभरतीसंदर्भात कुठलीही काळजी करू नका, तसंच तरूणांनाही सांगा, पुढील नोकरभरती आॅफलाइन पद्धतीनेच होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा