Advertisement

राष्ट्रवादीच्या पारड्यात राज्यसभेची चौथी जागा

राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी अडून बसलेल्या काँग्रेसला (congress) अलगदरित्या बाजूला करत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली आहे.

राष्ट्रवादीच्या पारड्यात राज्यसभेची चौथी जागा
SHARES

राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी अडून बसलेल्या काँग्रेसला (congress) अलगदरित्या बाजूला करत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi) आपलं स्थान किती मजबूत आहे, हे दाखवून दिलं आहे. राष्ट्रवादीकडून फौजिया खान (fauzia khan) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा- शिवसेनेला फसवलं, आम्ही चुकलो, भाजपची पहिल्यांदाच जाहीर कबुली

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (rajya sabha seats in maharashtra) एकूण १९ जागेपैकी ७ जागा येत्या २ एप्रिल रोजी रिक्त होत आहे. या जागांकरीता अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ मार्च आहे. तर १८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल. या निवडणुकीत विधानसभेतील निर्वाचीत आमदार मतदान करणार आहेत. राज्य विधानसभेत एका आमदाराच्या मताचं मूल्य १०० मतांएवढं आहे. विधानसभेत २८८ उमेदवार निवडून आले आहेत. म्हणजे सर्व आमदारांच्या एकत्रित मताचं मूल्य २८,८०० एवढं होतं. त्यानुसार राज्यसभेत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला ३,६०१ मतांची गरज आहे.

सध्याच्या आमदारांच्या संख्येनुसार भाजपचे ३, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येक एक उमेदवार निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची काही मतं शिल्लक रहात असल्याने राष्ट्रवादीने फौजिया खान यांच्या रुपाने आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

हेही वाचा- शरद पवारांपेक्षा पाचपट श्रीमंत सुप्रिया सुळे

दरम्यान शरद पवार (sharad pawar) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरला असून काँग्रेसने राजीव सातव, शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि डाॅ. भागवत कराड यांची उमेदवारी घोषित केली आहे. चौथी जागा आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेसकडून अटोकाट प्रयत्न करण्यात येत होते. परंतु अखेर राष्ट्रवादीने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली.   


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा