Advertisement

मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करा, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं परिवहनमंत्र्यांना साकडं

नवीन वर्ष उजाडलं तरी मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन सेवा सर्वांसाठी खुली होत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा धीर आता हळुहळू सुटू लागला आहे.

मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू करा, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं परिवहनमंत्र्यांना साकडं
SHARES

नवीन वर्ष उजाडलं तरी मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन (mumbai local train) सेवा सर्वांसाठी खुली होत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा धीर आता हळुहळू सुटू लागला आहे. आपल्या कामाधंद्यानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना लोकल ट्रेनची सेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. याच व्यथा घेऊन राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी नुकतीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली.

लोकलअभावी सर्वांच्याच वेळेचा अपव्यय होऊन आर्थिक भुर्दंडही बसतोय. मुंबईत #APMC मध्ये गेलो असता माथाडी कामगारांनीही ही व्यथा मांडली. म्हणून सर्वांसाठीच लोकल सुरू करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांमार्फत केंद्राकडं पाठपुरावा करण्याची विनंती परिवहनमंत्री अनिल परब यांना केली, अशी माहिती रोहीत पवार (rohit pawar) यांनी दिली. 

हेही वाचा- या आठवड्यात मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू होणार?

सर्वसामान्य प्रवाशांसाठी सरकारने अजूनही लोकलची दारं उघडलेली नसल्याने सर्व स्तरातून राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनावर टीका केली जात आहेत. शिवाय लोकल सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार व आंदोलनं केली जात आहेत. तरीही लोकल सेवा सुरू होत नसल्याने प्रवाशांसह प्रवासी संघटनांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

त्यातच येत्या आठवड्यात सर्वांसाठी लोकल सुरू होण्याबाबत निर्णय अपेक्षित असल्याचं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे. त्यामुळं रेल्वे आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय रेल्वे प्रवासी महासंघानं घेतला आहे. शिवाय, सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असंही महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

चेन्नई रेल्वेच्या धर्तीवरच मुंबई लोकलमध्ये सर्वप्रथम अत्यावश्यक व त्यानंतर विनागर्दीच्या वेळेत महिलांना प्रवासमुभा देण्यात आली. तिसरा आणि निर्णायक टप्प्यात चेन्नई पॅटर्न अर्थात महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादित वेळेत प्रवास मुभा देण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजत आहे.

(ncp mla rohit pawar meets maharashtra transport minister anil parab on mumbai local train issue)

हेही वाचा- राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांचं नवं पथक?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा