Advertisement

सुनेच्या छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण

नातू हवा म्हणून मी सुनेचा छळ करते, असा माझ्यावर लावण्यात आलेला आरोप साफ खोटा आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, ​आमदार विद्या चव्हाण​​​ यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

सुनेच्या छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
SHARES

नातू हवा म्हणून मी सुनेचा छळ करते, असा माझ्यावर लावण्यात आलेला आरोप साफ खोटा आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आमदार विद्या चव्हाण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण (Ncp mla vidya chavan) आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात १६ जानेवारी रोजी त्यांच्या सूनेने तक्रार नोंदवली होती. दुसरी मुलगी झाल्यानं तिचा छळ करण्यात येत असल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण ५ जणांविरुद्ध विलेपार्ले पोलीस ठाण्यात (vile parle police) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५३६ आणि ३६ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


हेही वाचा- सूनेचा छळ केल्याप्रकरणी आमदार विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल

त्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना, हे सर्व आरोप साफ खोटे असल्याचं विद्या चव्हाण यांनी स्पष्ट केलं. चव्हाण म्हणाल्या, 'माझा मुलगा इंजिनिअर असून कंपनीच्या ट्रेनिंगसाठी १० डिसेंबर रोजी तो डेन्मार्कला जाणार होता. त्याच्या काही दिवस आधी मोबाइल खराब झाला म्हणून सुनेने माझ्या मुलाला तो दाखवला. मोबाइल तपासत असताना व्हाॅट्सअॅपवर त्याला काही आक्षेपार्ह मेसेज आढळल्यावर त्याला धक्का बसला. आपल्या पत्नीचे चार व्यक्तींसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यातून समोर आलं. त्यानं त्याबाबत आम्हाला सांगितलं आणि गौरीशी (माझ्या सुनेशी) बोलून घटस्फोट घेण्याचा निर्णय सांगितला. 

त्यानंतर माझ्या सुनेने वकिलांचा सल्ला घेऊन आरोप सुरू केले. तिनं आमच्याविरोधात ३ कोटींचा दावाही केला. सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्यानं मी त्यावर अधिक बोलू शकत नाही. न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल. खरंतर माझा मुलगा आणि सून दोघेही सज्ञान आहेत. त्यांना ५ वर्षांची मुलगी आहे. पुढं काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. नवरा-बायकोच्या वादात मला विनाकारण ओढण्यात आलं आहे', असं त्यांनी सांगितलं.

'मागील अनेक वर्षांपासून मी महिलांसाठी काम करते. माझ्या दोन्ही सुनांना मी मुलींसारखंच वागवलंय. त्यामुळं मुलासाठी मी सुनेचा छळ करत असल्याचे आरोप निराधार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळी आम्हाला आनंदच झाला होता. तेव्हा मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणं शक्यच नाही, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा- आता लाभाची पदं कशी चालतात? चंद्रकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा