समृद्धी महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग- नवाब मलिक


SHARE

मुंबई नागपूरला जोडण्यासाठी उभारण्यात येणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा असून हा महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. बॅलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची सरकारने पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती भ्रष्टाचार सुरू ठेवण्यासाठी भाजपाने केल्याचा आरोपही यावेळी मलिक यांनी केला.  


आघाडी सरकारला बदनाम करण्याची खेळी

गेल्या ३ वर्षांत ३०७ सिंचन प्रकल्पांसाठी ३९ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारकडून देण्यात आली. मात्र आघाडी सरकारच्या काळात ४६ हजार कोटी रुपये खर्च झाले. तरीही त्यावेळचे विरोधक आणि आताच्या सत्ताधाऱ्यांनी ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. मग आता ३९ हजार कोटी रुपयांची मान्यता देतानाही भ्रष्टाचार झाला का? असा सवाल मलिक यांनी केला.


१८ पेक्षा जास्त मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

गेल्या तीन वर्षांत १८ पेक्षा जास्त मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना क्लिनचिट मिळत गेली. त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आता त्यांनाही मुख्यमंत्री क्लीन चीट देत असून एक प्रकारे भ्रष्टाचाराची पाठराखणच मुख्यमंत्री करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.हेही वाचा-

हकालपट्टी झालेले राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत

मोपलवारांकडून मागितली १० कोटींची लाच, मांगले दाम्पत्याला अटक


संबंधित विषय
ताज्या बातम्या