Advertisement

“केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचं काम करतंय”

जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होत असताना, केंद्र सरकार मात्र इंधनाच्या दरांत सातत्याने वाढ करून जनतेचे खिसे कापण्याचं काम करत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

“केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचं काम करतंय”
SHARES

जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होत असताना, केंद्र सरकार मात्र इंधनाच्या दरांत सातत्याने वाढ करून जनतेचे खिसे कापण्याचं काम करत असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी केली आहे.

देशात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल काही दिवसांत शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जगात दर कमी असताना भारतात किंमती कशा वाढवल्या जातात, असा सवाल नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.

केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचं काम करत आहे. हे सरकार पाकिटमार सरकार बनलेय का? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला. देशात कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवून लोकांची लूट थांबवावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

हेही वाचा- पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच, मुंबईत आहे 'इतका' दर

निवडणुकीनंतर देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर १८ हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. याची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतच्या घोषणेचं काय झालं? असा प्रश्नही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, देशात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधनांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलची किंमत २६ पैशांनी तर डिझेलची किंमत ३१ पैशांनी वाढवण्यात आली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात १८ ते २७ पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत २६ ते ३५ पैसे वाढ झाली होती. 

मुंबईत आता पेट्रोल प्रती लिटर ९८.१२ रुपयांना मिळत आहे. तर डिझेलचा दर ९० रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत २७ पैशांची वाढ झाली असून ते ९२ रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढ होऊन ते ८२.३६ रुपयांवर पोहोचलं आहे. 

पश्चिम बंगालसह ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांनी इंधनांच्या दरात वाढ करण्यास सुरूवात केली. आठवडाभरात पेट्रोल १ रुपया १४ पैसे, तर डिझेल १ रुपया ३३ पैशांनी महाग झालं आहे.

 हेही वाचा- मुंबईतल्या कोरोना आकड्यांतील बनवाबनवी ताबडतोब थांबवा- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा