चंद्रकांत पाटीलही जुमलेबाज- नवाब मलिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार असल्याचा जुमला मारला होता. तसाच जुमला महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही मारत असल्याचं सांगत भाजपाच्या नेत्यांनी ही जुमलेबाजी बंद केली पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

SHARE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार असल्याचा जुमला मारला होता. तसाच जुमला महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही करत असल्याचं सांगत भाजपाच्या नेत्यांनी जुमलेबाजी बंद केली पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत होते.


लोकं बळी पडणार नाहीत

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०२२ पर्यंत देशातील सर्वच नागरिक श्रीमंत होतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा नवाब मलिकांनी समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी जसा जुमला मारला होता, तसाच जुमला चंद्रकांत पाटील मारत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाच्या नेत्यांनी ही जुमलेबाजी बंद केली पाहिजे. तसंच आता त्यांनी कितीही स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्याला बळी पडणार नसल्याचंही ते म्हणाले.


प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज

केंद्र सरकारने ८४ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा करून देशाला पोखरल्याचा आरोप मलिक यांवी केला. यूपीए सरकारच्या काळात हे कर्ज ४२ लाख कोटींचं होतं. परंतु आता ते दुप्पट झाल्याचं ते म्हणाले. तसंच यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील मोदी सरकाने प्रत्येकाच्या डोक्यावर ६५ हजारांचे कर्च करून ठेवल्याचा आरोप केला.
हेही वाचा -

मेन इन ब्ल्यू अवतरले आर्मी कॅपमध्ये!

पालघरमध्ये २ टेम्पो जिलेटिन, डिटोनेटर जप्त
संबंधित विषय
ताज्या बातम्या