राष्ट्रवादीची एकला चलो रे ची भूमिका

 Churchgate
राष्ट्रवादीची एकला चलो रे ची भूमिका

नरिमन पॉईंट – आगामी महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत येत्या रविवारी 20 नोहेंबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भव्य मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिलीय. आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तयार होती. मात्र कॉंग्रेसकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. आतापर्यंत आम्ही 437 फॉर्म उमेदवारांना दिले आहेत. महापालिकेच्या निवडणूकांबाबत आघाडीची कोणतीही चर्चा आमच्यात झाली नाही . त्यामुळे आम्ही कोणाचीही वाट न बघता महापालिका निवडणूक एकटे लढण्यास तयार असल्याचे अहिर यांनी सांगितले.

Loading Comments