Advertisement

महाआघाडीच्या तुलनेत भाजप २० टक्के देखील नाही- जयंत पाटील

राज्यात महाआघाडीच्या तुलनेत भाजप २० टक्के देखील नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

महाआघाडीच्या तुलनेत भाजप २० टक्के देखील नाही- जयंत पाटील
SHARES

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा सातत्याने भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यात महाआघाडीच्या तुलनेत भाजप २० टक्के देखील नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (jayant patil) केलं आहे. एवढंच नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सगळ्यात जास्त जागांवर विजयी झाल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.     

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही घटक पक्षांनी एकत्र मिळून ही निवडणूक लढवलेली नाही. तर तिन्ही पक्षांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात ही निवडणूक वेगवेगळी लढवलेली आहे. अशा स्थितीत देखील तिन्ही पक्षांना जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. तिन्ही घटक पक्षांचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. बहुतेक जागा या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या ताब्यात आलेल्या आहेत. या तुलनेत भाजपचं अस्तित्व फार मर्यादित राहिलं आहे. राज्यात महाआघाडीसमोर भाजपला (bjp) मिळालेल्या जागा २० टक्के देखील नाही.

हेही वाचा- मराठा आरक्षणावर सरकारच्या मनात नेमकं काय?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा तपशीलच यावेळी जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांपुढे सादर केला. त्यांनी माहिती देताना सांगितलं की, राज्यात १३ हजार २९५ जागांच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी ३ हजार २७६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) विजय मिळाला आहे. काँग्रेसला १ हजार ९३८ जागांवर यश मिळालं आहे. भाजप २ हजार ९४२ जागांवर विजयी झाली आहे, तर शिवसेना २ हजार ४०६ जागांवर विजयी झालेली आहे. हे आकडे पुरेसे बोलके असून राष्ट्रवादी काँग्रेस हाच तळागाळातील पक्ष ठरला आहे.

भाजपच्या नेत्यांनी कितीही सर्वाधिक जागा जिंकल्याचे दावे केले, तरी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष सर्वात जास्त जागांवर विजयी झाला आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

 येत्या १५ फेब्रुवारीच्या आत राज्यातील (maharashtra) ग्रामपंचायतींमध्ये नवीन सरपंच आणि उपसरपंचांची निवड होणार आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कुठली ग्रामपंचायत कुठल्या पक्षाच्या ताब्यात जाईल, हे कळू शकेल.

(ncp wins most seats in maharashtra gram panchayat election 2021 says jayant patil)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा