Advertisement

मराठा आरक्षणावर सरकारच्या मनात नेमकं काय?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

राज्य सरकारने घातलेल्या घोळामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या मनात नेमकं काय सुरू आहे, तेच कळत नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावर सरकारच्या मनात नेमकं काय?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
SHARES

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली मराठा आरक्षण प्रकरणावरील सुनावणी पुढील महिन्यात ढकलण्यात आल्याने भाजप (bjp) नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने घातलेल्या घोळामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या मनात नेमकं काय सुरू आहे, तेच कळत नसल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात बुधवार २० जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. यामुळे अर्थातच मराठा आरक्षणाच्या अंमलबाावणी संदर्भातील निर्णय देखील लांबणीवर पडला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, राज्य सरकार ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या प्रकरणात घोळ घालत आहे, त्यावरुन सरकारच्या मनात नेमकं काय आहे तेच कळत नाही. काही पिटीशन दाखल होतात आणि मग त्यासाठी राज्य सरकार वेळ मागत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या अंमलबाजवणीत निष्कारण दिरंगाई होत आहे.

हेही वाचा- कुलाब्यात बाळासाहेबांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध

मराठा आरक्षणा संदर्भात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती केवळ सरकारच्या घोळामुळे आहे. राज्य सरकार (maharashtra government) ठामपणे एक भूमिका मांडताना दिसत नाही. प्रत्येक वेळेस नवीन भूमिका मांडली जात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारमध्येच मोठ्या प्रमाणावर मतभेद दिसत आहेत. कुठलाही समन्वय दिसत नाही. वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. सरकारची कमिटी कुणाशी बोलते, काय निर्णय होतो काहीच कळत नाही. सर्व प्रकारच्या आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं, अशी राज्य सरकारची कृती दिसत आहे. त्यातूनच एमपीएससी आणि राज्य सरकारचा घोळ तयार झाला आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजपला चर्चेला बोलवलं नाही, याविषयी आमची काहीच तक्रार नाही. परंतु भाजपाचं समाधान करण्यापेक्षा तुमच्या नाकर्तेपणामुळं ज्यांना आरक्षण मिळत नाही, त्यांचं समाधान करा. तुम्हाला काय करायचंय ते करा पण मराठा समाजाला न्याय द्या,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

(devendra fadnavis slams maharashtra government over maratha reservation hearing postpone in supreme court)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा