Advertisement

अर्णब गोस्वामींना अटक? गृहमंत्र्यांनी दिले संकेत

अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.

अर्णब गोस्वामींना अटक? गृहमंत्र्यांनी दिले संकेत
SHARES

बालाकोटवर झालेल्या अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील हल्ल्याची माहिती रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडे कशी आली? असा प्रश्न उपस्थित करत हा देशद्रोहाचा प्रकार असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेसने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्याकडे केली आहे. त्यावर अनिल देशमुख यांनीसुद्धा अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे.

पुलवामा इथं सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. याबाबतची अत्यंत गोपनीय माहिती अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट मधून उघड झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत गोस्वामी यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी काँग्रेस (congress) सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या मागणीचं निवेदन गृहमंत्र्यांना दिलं.

हेही वाचा- भाजप आमदार राम कदमांचं ‘तांडव’, पोलिसांनी घेतलंं ताब्यात

यावेळी सचिन सावंत म्हणाले, संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर बाब आहे. लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली? ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या ३ दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली? त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. अर्णब गोस्वामी यांचं कृत्य हे ऑफिस सीक्रेट्स अॅक्ट, १९२३, सेक्शन-५ (Official Secrets Act, 1923, Sec. 5) नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) अर्णब गोस्वामी यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (sachin sawant) यांनी तक्रार केली आहे की, अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाॅट्सअॅप संभाषणातून देशाच्या सुरक्षेसंदर्भात अत्यंत संवेदनशील माहिती समोर आली आहे. आम्ही याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेत आहोत. राज्य सरकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील कायदेशीर कारवाई करेल.

(congress leader sachin sawant demands to arrest republic tv editor arnab goswami)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा