Advertisement

पुन्हा एकदा फडणवीस सरकार..!

कर्नाटक सरकारने मराठी भाषकांसाठी मराठा विकास प्राधिकरणाची (एमडीए) स्थापना केली आहे. यावरून भाजप नेत्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.

पुन्हा एकदा फडणवीस सरकार..!
SHARES

कर्नाटक सरकारने मराठी भाषकांसाठी मराठा विकास प्राधिकरणाची (एमडीए) स्थापना केली आहे. यावरून भाजप (bjp) नेत्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी तर पुन्हा एकदा फडणवीस सरकारची हाक दिली आहे.

कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० कोटींची तरतूद पण केली! आणि इथं महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेलं सगळं बंद करुन टाकलं.. म्हणून पाहिजे परत एकदा..फडणवीस (devendra fadnavis) सरकार!!! असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.

हेही वाचा- “घाबरून सरकारला मंदिरं उघडावीच लागली”

कर्नाटकातील मराठी बांधवांसाठी मराठी विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केली आहे. या प्राधिकरणासाठी कर्नाटक राज्याच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी बांधवांच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. या प्राधिकरणाकडून मराठी बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे.

कर्नाटकच्या बसवकल्याण विधानसभा मतदारसंघासाठी लवकरच पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी ही घोषणा केल्याचे समजत आहे.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधून कामकाज केलं होतं.

हेही वाचा- महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता- प्रवीण दरेकर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा