Advertisement

नितीन गडकरींना भर कार्यक्रमात भोवळ; रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

राहुल कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी गडकरी नगरमध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना गडकरी यांना भोवऴ आली.

नितीन गडकरींना भर कार्यक्रमात भोवळ; रूग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
SHARES

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी दुपारी एका कार्यक्रमादरम्यान भोवळ येऊन कोसळले. साखर कमी झाल्यानं आणि उन्हाचा त्रास झाल्यानं गडकरींना भोवळ आल्याचं म्हटलं जात असून त्यांना त्वरीत अहमदनगर, राहुरी कृषी विद्यापीठाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना लवकरच विशेष विमानानं नागपूरला नेण्यात येणार आहे.


राज्यपालांनी सावरलं

राहुल कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी गडकरी नगरमध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना गडकरी यांना भोवऴ आली, ते कोसळताहेत असं लक्षात आल्याबरोबर राज्यपाल सी. विद्यासागर यांनी गडकरींना सावरलं. त्यानंतर त्यांना लागलीच राहुरी कृषी विद्यापीठाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं.


दौरा रद्द 

 गडकरी यांना मधुमेहाचा त्रास असून त्यांच्या शरीरातील साखर कमी झाली आणि त्यामुळं त्यांना भोवळ आल्याची माहिती समोर येत आहे. डाॅक्टरांनी त्यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं. गडकरी यांचा नियोजित दौरा आता रद्द करण्यात आला असून त्यांना लवकरच विशेष विमानानं नागपुरला नेण्यात येणार आहे. 



हेही वाचा - 

मलबार हिल नव्हे रामनगरी? मामांची मलबारहिलच्या नामांतराची मागणी

दादरच्या 'नामांतरा'ऐवजी आंबेडकरांचे विचार आत्मसात करा, प्रकाश आंबेडकरांनी भीम आर्मीला सुनावलं




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा