Advertisement

दादरच्या 'नामांतरा'ऐवजी आंबेडकरांचे विचार आत्मसात करा, प्रकाश आंबेडकरांनी भीम आर्मीला सुनावलं

गुरूवारी दादर रेल्वे स्थानकाबाहेर आणि स्थानकात भीम आर्मीनं आंदोलन केलं. स्थानकावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस अशी स्टिकर-पोस्टर लावली. हे आंदोलन सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मात्र दादर स्थानकाच्या नावाला विरोध दर्शवला आहे.

दादरच्या 'नामांतरा'ऐवजी आंबेडकरांचे विचार आत्मसात करा, प्रकाश आंबेडकरांनी भीम आर्मीला सुनावलं
SHARES

दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असं करावं या मागणीसाठी भीम आर्मीनं ६ डिसेंबरला, गुरूवारी जोरदार आंदोलन केलं. पण भीम आर्मीच्या या मागणीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आणि भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र विरोध केला आहे. दादर स्थानकाचं नाव दादरच रहायला हवं, स्थानकाच्या नामांतरापेक्षा आजच्या घडीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करत ते आचरणात आणण्याची खरी गरज असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आपला या मागणीला विरोध असल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


मागणी जोर धरतेय

दादर, चैत्यभूमीवर ६ डिसेंबरला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी येतात. तर वर्षभर चैत्यभूमीला अनुयायींची गर्दी असते. त्यातच आता इंदू मिल इथं डाॅ. बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं राहणार आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी स्थानक करावं, अशी मागणी गेल्या २५-३० वर्षांपासूनची आहे. तर आता भीम आर्मीनं हा मुद्दा उचलत दादर रेल्वे स्थानकाचं नाव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी केली आहे.


स्थानकावर स्टिकर

या मागणीसाठी गुरूवारी दादर रेल्वे स्थानकाबाहेर आणि स्थानकात भीम आर्मीनं आंदोलन केलं. स्थानकावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस अशी स्टिकर-पोस्टर लावली. हे आंदोलन सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मात्र दादर स्थानकाच्या नावाला विरोध दर्शवला आहे. दादर असो वा माहीम किंवा कुलाबा, या सर्व परिसरांना एेतिहासिक वारसा लाभला असून त्यांची नावं बदलणं गरजेची नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.


राज यांना टोला

तर राम मंदिराच्या नावावर निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला आहे. निवडणुकीदरम्यान दंगली घडणारच हे मी आधीपासूनच सांगत आलो असून आता इतर राजकीय नेते याची काॅपी करत असल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोलाही लगावला आहे.हेही वाचा-

दादर रेल्वे स्थानकाच्या 'नामांतरा'साठी भीम आर्मीचं आंदोलन

आंबेडकर स्मारकाचा मुद्दा पेटणार! ६ डिसेंबरला आंबेडकर अनुयायी धडकणार इंदू मिलवरRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा