नितिन गडकरींचा 'मॅनेजमेंट' फंडा!

मुंबई - महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केलेलं एक नाव म्हणजे नितीन गडकरी. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी एका वेगळ्याच पेहेरावात पहायला मिळाले.

निमित्त होतं व्यवस्थापन शाळेच्या पदवीधर समारंभाचं. यावेळी नितीन गडकरी यांनी या पदवीधर विद्यार्थ्यांना माणुसकी जपण्याचा सल्ला दिला.

करिअरला सुरुवात करण्याआधी नितीन गडकरींकडून या मॅनेजमेंट स्टुडंट्सला मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे नितीन गडकरींच्या रुपात या विद्यार्थ्यांना एक मॅनेजमेंट गुरूच भेटला असं म्हणावं लागेल.

Loading Comments