राणेंच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांना स्थानच नाही !

  Mumbai
  राणेंच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांना स्थानच नाही !
  मुंबई  -  

  सिंधुदुर्गात शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित हारणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी सुरू आहे. मात्र राणेंच्या पोस्टरवर काँग्रेसचा उल्लेख नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

  राणेंच्या पोस्टरवर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फोटो झळकत आहेत. त्यावर नारायण राणेंच्या वतीने हार्दिक स्वागत, असे लिहिण्यात आले आहे.  हे देखील वाचा -

  गडकरी, फडणवीस करणार राणेंसोबत स्नेहभोजन

  हे देखील वाचा - 

  अखेर राणे मोदींना भेटले!  कुडाळच्या बस डेपो मैदानावर होणार कार्यक्रम  

  विशेष म्हणजे या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार नारायण राणे हे दोघेही बऱ्याच वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आणि राणे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या कार्यक्रमाची पूर्ण तयारी करण्यात आली असून, 400 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.