Advertisement

आॅक्सिजन टंचाईमुळे राज्यात एकही मृत्यू नाही- राजेश टोपे


आॅक्सिजन टंचाईमुळे राज्यात एकही मृत्यू नाही- राजेश टोपे
(File Image)
SHARES

राज्यात ऑक्सिजन टंचाईमुळे एकाही कोविड रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ऑक्सिजनची मागणी वाढल्यानंतर आम्ही औद्याेगिक वापराचा ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी राखून ठेवला होता, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली आहे.

कोरोना काळात मृत्यू झाले असले तरी या काळात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती देत याबाबत राज्य सरकारने कोर्टात लेखी शपथपत्र दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ऑक्सिजन तुटवडा भासू नये यासाठी औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन सुद्धा वैद्यकीय कारणासाठी राखून ठेवला होता. ऑक्सिजनचा काटकसरीने वापर करण्यात आला. यासाठी वॉर्डात ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबवण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- संततधार पावसामुळं 'हे' धरण भरण्याची शक्यता

राज्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेत दररोज ६५ हजार लोक पॉझिटिव्ह येत होते. या रुग्णांसाठी १७०० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आला. राज्यात १४०० आणि केंद्र सरकारने शेजारील राज्यातून ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासली नाही. 

नाशिकमध्ये टॅंकरमधून आॅक्सिजन सिलिंडरमध्ये भरताना गॅस लीक झाला. परंतु त्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी राज्यसभेत विरोधकांनी केंद्र सरकारला कोरोनाच्या दुसरी लाटेची परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही असा आरोप करत जोरदार टीका केली होती. यावेळी विरोधकांच्या आरोपांचं खंडन करताना आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार राज्यसभेत सांगितलं की, आरोग्य हा राज्याचा विषय आहे.

त्यामुळे सर्व राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. केंद्राच्या आदेशानुसार मृत्यूचे रिपोर्ट राज्यांनी दिले आहेत. यामध्ये कोणत्याही राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं एकही मृत्यू झाल्याची नोंद आढळलेली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा