Advertisement

मृत्यू कोरोनामुळे नाही, तर नैसर्गिकच, प्रकाश आंबेडकरांचा दावा

सगळे मृत्यू नैसर्गिकच असून सरकार आपल्याला फसवत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मृत्यू कोरोनामुळे नाही, तर नैसर्गिकच, प्रकाश आंबेडकरांचा दावा
SHARES

जो माणूस जन्माला आला, त्याला कधी ना कधी मृत्यू येणारच, अशी गौतम बुद्धांची शिकवण आहे. आतापर्यंत ज्या रुग्णांचे मृत्यू झाले, त्यापैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं त्याच्या पोस्टमाॅर्टम रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे का? कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं प्रमाणपत्र एका तरी रुग्णालयाने दिलं आहे का? असा प्रश्न उपस्थित करत हे सगळे मृत्यू नैसर्गिकच असून सरकार आपल्याला फसवत असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. (no one death due to coronavirus says vba chief prakash ambedkar

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसतं तेच मी बोलतोय. महाराष्ट्राची लोकसंख्या ८ ते १० कोटी इतकी आहे. सरासरी १० कोटींच्या लोकसंख्येत दिवसाला २००-२५० लोकांना मृत्यू झाल्यास त्यात नवीन काय आहे? यापेक्षा जास्त लोकं दरदिवशी मृत्यूमुखी पडली असती, काही महामारी आल्याचं म्हणता आलं असतं.

मार्च, एप्रिल, मे या महिन्यातील मृत्यूची आकडेवारी काढली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी मृत्यू झाले आहेत. हवं तर २०१९ आणि २०२० च्या मृत्यूची आकडेवारीची तुलना करून बघा. मागील १० वर्षात देशात एकही दिवस कुणाचा मृत्यू झाला नाही, असं मला उदाहरण द्या. त्यामुळे कोरोनामुळे कोणाचा मृत्यू होत नाही, तर निसर्गाच्या नियमानुसार त्याचा मृत्यू होतो, असं मला वाटतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

हेही वाचा - वंचितने हिंदुत्व स्वीकारलं का? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लादण्यात आलेल्या लाॅकडाऊनवर आमचा आक्षेप आहे. आम्ही तुम्हाला राज्य चालवायला ५ वर्षे दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिलेलं नाही. लोकांना घरामध्ये डांबून ठेवण्याचा सरकारला अधिकार नाही, मला बाहेर जायचं असेल, तर त्यावर बंदी आणता येत नाही, हा एकप्रकारे घटनेवरचा आघात आहे. त्यामुळे सरकारने आता सगळं काही पुन्हा सुरु करावं, अशी आमची मागणी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज्यातील धार्मिक स्थळं सुरू करण्यात यावीत, ही मागणी आम्ही अनेक दिवसांपासून करतोय. वारकरी त्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आमच्या मागण्यानंतर भाजपला जाग आली. आमच्यावर हिंदुत्वाचा ठप्पा ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचं हिंदुत्व हे इतर धर्माच्या विरोधातलं आहे. आमचं आंदोलन बहुजनांसाठी आहे. बारा बलुतेदारांची दुकाने मंदिराशेजारी आहे. मंदिरं सुरु झाली तर त्यांचा रोजगार सुरु होईल. भाजप हिंदुत्ववादी नव्हे तर मनुवाद्यांची पार्टी आहे. आमचा लढा हा मनुवाद्यांशी आहे. आम्ही कुठेही आमचा मार्ग बदलला नाही, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा