Advertisement

'विठ्ठल मंदिर उघडा', प्रकाश आंबेडकर करणार वारकऱ्यांसोबत आंदोलन

वारकऱ्यांनी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचं ठरवलं आहे.

'विठ्ठल मंदिर उघडा', प्रकाश आंबेडकर करणार वारकऱ्यांसोबत आंदोलन
SHARES

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. काही अटी-शर्थींच्या आधारे धार्मिक सणही साजरे केले जात आहेत. अशा स्थितीत राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी का नाही? असा प्रश्न उपस्थित करत वारकऱ्यांनी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर करणार आहेत. (Prakash Ambedkar led VBA wants temples to open in Maharashtra)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या ५ महिन्यांपासून देशभरातील धार्मिक स्थळांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. धार्मिक स्थळी पूजा-अर्चा करण्यास परवानगी असली, तरी सर्वसामान्य भाविकांसाठी अजूनही धार्मिक स्थळांची दारे बंदच ठेवण्यात आलेली आहेत. 

काही दिवसांपूर्वीच जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मुंबईतील दादर, भायखळा, चेंबूर येथील जैन मंदिरे खुली ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. येथील ३ मंदिरे सोडून अन्य कोणतीही मंदिरे प्रार्थनेसाठी उघडण्यात येणार नाहीत. तसंच मंदिरात कुठल्याही स्थितीत गर्दी होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. 

हेही वाचा- Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे

तसंच राज्यात मिशन बिगीन अंतर्गत हळुहळू सर्व गोष्टी सुरू होत आहे. माॅलही सुरू झाले आहेत. मग मंदिरं अजूनही का उघडली जात नाहीत. शासकीय नियमांचं पालन करून मंदिरं सुरू करता येणार नाहीत का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून विठ्ठल मंदिर बंद असल्याने तसंच भजन कीर्तनासही मनाई करण्यात आलेली आहे. आषाढी यात्रेदिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना प्रवेशबंदी होती. त्यामुळे वारकरी संप्रदाय नाराज आहे. परिणामी विठ्ठल मंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या मागणीसाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार असून या आंदोलनाला १ लाख वारकरी सहभागी होणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.

संध्या पंढरपुरात २ हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे मंदिर उघडायचं की नाही, यावर स्थानिक प्रशासनाच्या मनात धाकधूक आहे. तरीही याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी, मंदिर प्रशासन आणि आंदोनकर्त्यांच्या बैठकीनंतर घेण्यात येणार आहे. 

हेही वाचा- पर्युषण काळात मुंबईतील जैन मंदिरं उघडणार, सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा