Advertisement

तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

जसा मी माझ्या मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तसं तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका,' असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी बुधवारी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्यातील जनतेला दिला.

तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला
SHARES

तुम्ही घराबाहेर पाऊल टाकलं तर शत्रू घरात घुसेल. त्यामुळं घरातच राहा. घरात राहून काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. पण जसा मी  माझ्या मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तसं तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका,' असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी बुधवारी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्यातील जनतेला दिला.

राज्यातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी १२.३० वाजता पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. आज कुठलीही नकारात्मक गोष्ट सांगणार नाही, असं सुरुवातीलाच स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - Coronavirus Updates : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११९ वर

कुटुंबासोबत वेळ घालवा

ते पुढं म्हणाले, कोरोनाचं (coronavirus) संकट मोठं असलं, तरी संकटातूनही अनेक सकारात्मक गोष्टी दिसत आहेत. बऱ्याच वर्षांनी कुटुंबं एकत्र आली आहेत. आई-वडील, मुलं, नातवंड सगळे एकत्र आलेत. अनेक जण आपले छंद पूर्ण करून घेताहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र भगवा झालेला असतो. मात्र आज महाराष्ट्र शांत आहे. हरकत नाही. हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे. कोरोनाशी दोन हात करुन आपण ही लढाई जिंकू आणि त्यानंतर विजयाची गुढी उभारु, असा आत्मविश्वास त्यांनी जनतेला दिला.

चला हवा येऊ द्या

राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही, तो बंदही होणार नाही. वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत. परंतु जीवनावश्यक वस्तू आणायला घराबाहेर जात असाल तर एकट्यानंच जा. गर्दी करू नका. घरांमधले एसी बंद करण्याचे निर्देश केंद्राकडून आले आहेत. त्यामुळे, घरातले एसी बंद ठेवा आणि दारं खिडक्या उघड्या ठेवा. चला हवा येऊ द्या, कारण असं केल्याने करोनाचा प्रादुर्भाव थांबवता येईल, असं ते म्हणाले.

किमान वेतन मिळणार

ज्यांच तळहातावर पोट आहे, त्यांची काळजी सरकार घेणार आहे. सरकारच्या मदतीला आज अनेक हात पुढं येत आहेत. ज्या कंपन्यांनी त्यांचं उत्पादन बंद ठेवलं आहे, त्या कंपन्यांचे उद्योजक व मालक वर्गानं माणुसकीचा विचार करुन नोकरदारांचं किमान वेतन कापू नये, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केली. 

हेही वाचा- मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी, 'हे' आहेत संपर्क क्रमांक


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा