Advertisement

'अर्थसंकल्पात ओबीसींची चेष्टा'


'अर्थसंकल्पात ओबीसींची चेष्टा'
SHARES

माटुंगा - अर्थसंकल्पात ओबीसींची केंद्र सरकारने चेष्टा केल्याचा आरोप प्राध्यापक हरी नरके यांनी केला आहे. शनिवारी माटुंग्यातील कला केंद्रात ओबीसी समाजाच्या महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी नरके यांनी केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. या परिषदेला हरी नरके हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. नरेंद्र मोदी स्वत: ओबीसी समाजाचे असल्याचे सांगतात ते किमान ओबीसींच्या पदरात काहीतरी टाकतील असे अपेक्षित होते. मात्र अर्थसंकल्पामुळे आमची निराशा झाल्याचं त्यांनी सांगितलं. आकडेवारी देत या अर्थसंकल्पात ओबीसींच्या वाट्याला काय आले आहे? यावर त्यांनी विश्लेषण केले.

या कार्यक्रमाला अशोक गीते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ओबीसी शासकिय अधिकारी आणि कर्मचारी यांना एससी, एसटी बांधवांप्रमाणे पदोन्नती लागू करण्यात यावी, तसेच ओबीसीसाठी लावण्यात आलेली संविधान विरोधी क्रिमिलेअरची जाचक अट त्वरित रद्द करण्यात यावी, ओबीसींना आतापर्यंत लागू असलेल्या 27 टक्के आरक्षणाप्रमाणे सर्व शासकिय आणि निमशासकीय नोकऱ्याचा अनुशेष भरण्यात यावा अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा