Advertisement

हनुमान चालीसा प्रकरणात आपची उडी, भाजपावर लावला ‘हा’ आरोप

हनुमान चालीसा पठणावरून सुरु झालेल्या वादात आता आपनं पण उडी घेतली आहे.

हनुमान चालीसा प्रकरणात आपची उडी, भाजपावर लावला ‘हा’ आरोप
SHARES

हनुमान चालीसा पठणावरून सुरु झालेल्या वादात आता आपनं पण उडी घेतली आहे. मुंबई आपकडून (Mumbai AAP) 'भाऊ बंधुत्त्व आणि एकतेची हनुमान चालीसा' या नावानं ट्विटर स्पेसचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुंबई आपनं या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं होतं. मात्र, मुंबई आपची हनुमान चालीसा पठणाची स्पेस ब्लॉक झाली. आपनं यासाठी भाजपच्या आयटी सेलवर आरोप केले आहेत.

मुंबई आपनं ट्विटर स्पेस ब्लॉक झाल्यानंतर प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या प्रसिद्धीपत्रकात भाजप आयटीसेलवर आरोप करण्यात आले आहेत. भाजप आयटी सेलनं स्पेसवर रिपोर्ट केलं आणि व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आपनं केला. या घटनेतून भाजपची हनुमानाच्या प्रती असलेली श्रद्धा दिसून आली असून त्यांनी हनुमान चालीसा पठणाला विरोध केल्याचा आरोप आपच्यावतीनं करण्यात आला आहे.

कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी याचा वापर करण्यात येत आहे हे खऱ्या हनुमान भक्ताचं वर्तन नाही, असं मुंबई आपच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती मेनन शर्मा यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हनुमान आमच्या ह्रदयात आहेत. तर, हनुमानाच्या ह्रदयात भगवान राम आहेत. त्यामुळं ज्याच्या ह्रदयामध्ये बजरंग बली आहेत ती व्यक्ती इतरांना त्रास देण्यासाठी हनुमानाच्या नावाचा वापर करणार नाही, असं प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा

पंतप्रधानांच्या घराबाहेर हनुमान चालिसा, नमाज पठण करण्याची राष्ट्रवादीची मागणी

"हा तर मराठी माणसाचा अपमान", मुख्यमंत्र्यांचं नाव वगळल्यानं आव्हाडांची टीका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा