काँग्रेसचं 'एकला चलो रे'?

  Pali Hill
  काँग्रेसचं 'एकला चलो रे'?
  मुंबई  -  

  सीएसटी - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नसल्याची भूमिका मुंबई काँग्रेसनं घेतल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितलं.

  मुंबई शहर काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. '18 वर्षांपासून आम्ही छठपूजेचं आयोजन करतोय. भाजपाला मात्र महापालिका निवडणूक जवळ आल्यावरच छठपूजेची आठवण येतेय. जुहू समुद्रकिनारी लाखोच्या संख्येने भाविक जमा होतात, त्या धार्मिक सणाचं भाजपा राजकारण करतंय,' असा आरोपही निरुपम यांनी केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत स्थानिक नेते ते वरिष्ठांपर्यंत चर्चा करण्यात आली. तेव्हा वरिष्ठांनी तुम्ही स्थानिक पातळीवर जो निर्णय घ्याल, तो योग्य असेल असं सांगितलं. त्यानंतरच मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती न करता एकट्यानंच निवडणूक लढवल्याचा निर्णय घेतल्याचं निरुपम यांनी स्पष्ट केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.