Advertisement

अमृता फडणवीस गाऊ नयेत म्हणून 'या' पठ्ठ्याची ऑनलाईन याचिका

अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊ नये म्हणून ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे.

अमृता फडणवीस गाऊ नयेत म्हणून 'या' पठ्ठ्याची ऑनलाईन याचिका
SHARES

विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गायक असल्याचं सर्वांनाच माहित आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. गाण्यावरून त्यांना अनेकदा ट्रोल देखील केलं गेलंय. पण अमृता फडणवीस कधीच निराश झाल्या नाहीत.  

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी माझे अजून एक गाणे येत आहे, त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांचे स्वागत असल्याचं म्हणत आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली.

पण नेटकऱ्यांनी अमृता यांनी केलेली घोषणा आणि त्यामधील ट्रोलिंगचे आमंत्रण फारच गांभीर्यानं घेतलं ना राव. गाणं येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.


अमृता यांचे नवे गाणे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रदर्शित केले जाऊ नये, अशी मागणी करणारी ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे. या ऑनलाईन याचिकेस काही तासांमध्ये ५०० हून अधिक जणांनी समर्थन दिलं आहे.

हुनमंत ढोमे नावाच्या युझरनं सोमवारी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये, अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. अमृता यांचा या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये उल्लेख मामी असाही करण्यात आला आहे.

पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्यानं होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे असल्याचे या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच पुढे, आपला कान, आपली जबाबदारी, असंही लिहण्यात आलं आहे.

येत्या गुरुवारी मी गायलेले एक गाणे रिलीज होत असून हे गाणे एका सस्पेन्स चित्रपटातील असल्याचे अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं. तसंच हे येणारे नवीन गाणे हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे. हे गाणे एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असं आवाहनही अमृता यांनी केलं. त्यानंतरच ही याचिका दाखल केली आहे.



हेही वाचा

गाड्यांवरील मराठी नंबर प्लेट, मनसेने ठाकरे सरकारकडे केली 'ही' मागणी

लोकल सुरू केल्यावर कोरोनाचा त्रास नाही पण..? सुधीर मुनगंटीवार संतापले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा