Advertisement

लोकल सुरू केल्यावर कोरोनाचा त्रास नाही पण..? सुधीर मुनगंटीवार संतापले

दोन दिवसीय हिवाळी आधिवेशनाची सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला बैठकांच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

लोकल सुरू केल्यावर कोरोनाचा त्रास नाही पण..? सुधीर मुनगंटीवार संतापले
SHARES

दोन दिवसीय हिवाळी आधिवेशनाची सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला बैठकांच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. लोकल सुरु केल्यावर कोरोनाचा त्रास होत नाही, पण आम्ही बैठक घेतली तर कोरोनाचा त्रास होतो. असं कोरोनानं तुमच्या कानात येऊन सांगितलंय का?, असा संतप्त सवाल भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी महाविकास आघाडी सरकारला केला.

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील आपल्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे. सभागृहात बोलताना ते म्हणाले, नियमावलीच्या पुस्तकानुसार पहिल्या अधिवेशनाच्या आत हे व्हायला हवं. अध्यक्ष म्हणून अतिशय लोकशाहीवादी भूमिका तुम्ही घेतली आहे. परंतु 

या समित्यांमध्येसुद्धा राजकारण सुरू असल्याचं महाराष्ट्रातील जनतेला समजू द्या. विधान परिषद सदस्यांची नाव येत नाही म्हणून समित्यांचं कामकाज होऊ द्यायचं नाही? काय अडचण आहे? लोकल सुरू करता येते तिथं कोरोनाचा त्रास नाही. परंतु पण उद्या आम्ही बैठक घेतली तर कोरोना तुम्हाला सांगतो काय की बैठका घेतल्या तर याद राखा? अध्यक्ष महोदयांनी या बैठका सुरू करण्याचे त्वरीत आदेश द्यावेत. सर्व समित्या कोमामध्ये आहेत. लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं काम होता कामा नये,असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठका सुरू करण्याबाबत उद्या निर्णय घेण्यात येईल, असं मुनगंटीवार यांना सांगितलं. 

हेही वाचा- घरात सापडले पाकिस्तानी क्रेडिट कार्ड? प्रताप सरनाईक म्हणाले...

आपण महाराष्ट्र (maharashtra vidhan sabha) विधानसभेच्या १८० पानांचं नियमांचं जे पुस्तक दिलं त्यात ३२० नियम आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्तम व्यवस्था केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबाही सभागृहात घुसू शकणार नाही. जशी कोरोनाबाबतची नियमावली ठरवली, तशी सभागृहाच्या कामकाजाची नियमावली ठरवणार आहात की नाही? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

राज्यापुढं अनेक प्रश्न आहेत. दोन दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला परवडणारं नाही. आमदारांचे अधिकार आणि त्यांचे आपण प्रश्न सभागृहातच मांडू शकतो. सरकार आणि विरोधकांनी एकत्र बसून एक नियमावली तयार करता येईल. इतर राज्यांप्रमाणे ८ ते १० दिवसांचं अधिवेशन घेतलं जाऊ शकतं. पुढील अधिवेशन नियमित होईल, अशी कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(bjp leader sudhir mungantiwar slams thackeray government over committee meeting in maharashtra assembly winter session)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा