Advertisement

अविश्वास ठरावावरून विधानसभेत गदारोळ

सत्ताधारी सातत्याने सभागृहाचे नियम आणि प्रथा-परंपरेच्या विरुद्ध कामकाज करत असल्याचा आरोप करून विरोधक सभागृहात गोंधळ घालत असल्याने सभागृहाचं कामकाज आतापर्यंत दोनदा तहकूब करण्यात आलं आहे.

अविश्वास ठरावावरून विधानसभेत गदारोळ
SHARES

सत्ताधारी पक्षाने विरोधकांवर कडी करत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी सातत्याने सभागृहाचे नियम आणि प्रथा-परंपरेच्या विरुद्ध कामकाज करत असल्याचा आरोप करून विरोधक सभागृहात गोंधळ घालत असल्याने सभागृहाचं कामकाज आतापर्यंत दोनदा तहकूब करण्यात आलं आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर कुठलीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी थेट विश्वासदर्शक ठराव मंजूर करून नियमाची पायमल्ली केली.


तेव्हाचा ठराव वेगळा

२००६ साली तत्कालीन विलासराव देशमुख यांनीही अशाप्रकारे विश्वासदर्शक ठराव मंजूर केल्याचा दाखला या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. मात्र त्यावेळी देशमुख यांनी मंत्रीमंडळाच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मांडला होता. अध्यक्षांच्या बाजूने ठराव मांडण्यात आला नव्हता. त्यामुळे तेव्हाची आताच्या प्रकरणाशी तुलना होऊ शकत नाही, असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला.

राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांनी या विषयावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाषणे केली.


नियमानुसार काम

यावेळी संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देताना सांगितलं की, आम्ही जे कामकाज करीत आहोत ते नियमानुसार करत आहोत. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघाल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सुरूवातीला १० मिनिटांसाठी आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.



हेही वाचा-

सरकारचा गनिमी कावा!! विरोधकांना गाफील ठेवत विश्वासदर्शक ठराव पास

संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा