Advertisement

महाराष्ट्रातील विरोधक ब्लॅक फंगस सारखे- संजय राऊत

देशपातळीवरून मुंबई माॅडेलचं कौतुक होत असताना देखील विरोधक सातत्याने प्रशासनावर टीका करत असल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांना चक्क ब्लॅक फंगसची उपमा देऊन, सुनावलं आहे.

महाराष्ट्रातील विरोधक ब्लॅक फंगस सारखे- संजय राऊत
SHARES

महाराष्ट्राचा कोरोना विषाणूच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेशी मुकाबला सुरू असतानाच ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. त्यातच देशपातळीवरून मुंबई माॅडेलचं कौतुक होत असताना देखील विरोधक सातत्याने प्रशासनावर टीका करत असल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांना चक्क ब्लॅक फंगसची उपमा देऊन, सुनावलं आहे.

पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या सेंटरचं खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असली, तरी महिन्याभरापूर्वी सर्वत्रच अत्यंत भीषण परिस्थिती होती. पुणे, मुंबई-ठाणे, नाशिक, नागपूर सारख्या शहरांसोबतच काही जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे बेड्स, आॅक्सिजन, औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला होता. या सर्व शहरांच्या तुलनेत मुंबई महापालिका प्रशासनाने अत्यंत झटपट कोरोनाबाधितांसाठी बेड्सची संख्या वाढवली, आॅक्सिजन आणि औषधांचं व्यवस्थापन करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. 

हेही वाचा- पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही फडणवीसांना घरचा आहेर- सचिन सावंत

महापालिका (bmc) प्रशासनाच्या या कामगिरीचं कौतुक सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयानेही केलं. एवढंच नव्हे, तर देशातील इतर महापालिकांनी मुंबई माॅडेल समजून घेत ते राबवण्याची सूचना केली. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांचं कौतुक केलं. तर नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही महापालिका प्रशासनाला शाबासकीची थाप दिली. 

असं असूनही महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप (bjp) नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिकेवर टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि प्रविण दरेकर मुंबईसह महाराष्ट्रात कमी आरटीपीसीआर चाचण्या होत असल्याचा, कोविड मृत्यू दडपत असल्याचा आरोप करताना दिसतात. 

त्यावर, निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकजणांनी घेतली. या कामाचं विशेष कौतुक केलं. मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावं. कारण विरोधक हे ब्लॅक फंगस आहेत, असं म्हणत राऊत यांनी शिवसैनिकांना कामाकडे लक्ष देण्याची सूचना केली.  

(opposition in maharashtra like a black fungus says sanjay raut)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा