Advertisement

पोलीस बदल्यांच्या रॅकेटवर मुख्यमंत्र्यांचं पांघरूण, फडणवीसांचा गंभीर आरोप

पोलिसांच्या बदल्यावरील घोटाळ्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्षरश: पांघरून घातलं, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पोलीस बदल्यांच्या रॅकेटवर मुख्यमंत्र्यांचं पांघरूण, फडणवीसांचा गंभीर आरोप
SHARES

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही घोटाळे करण्यात आले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना कारवाईचा सल्ला देऊनही त्यांनी कोणतेही पाऊल उचललं नाही. पोलिसांच्या बदल्यावरील घोटाळ्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी अक्षरश: पांघरून घातलं, असा आरोप करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन मोठा गौप्यस्फोट केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पोलीस दलात बदल्यांचं खूप मोठं रॅकेट असून यात अनेक अधिकारी देखील सामील असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना मिळाली होती. ही माहिती त्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना दिली. पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला विनंती करून सर्व संशयीतांच्या कॉल इंटरसेप्शनची परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यावर कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्फोटक माहिती समोर आली. बदल्यांच्या रॅकेटमध्ये अनेक मोठे अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं समोर आली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला.

हेही वाचा- “पवारांकडून देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न उघड”

त्यानंतर हे सर्व पुरावे रश्मी शुक्ला यांनी २५ ऑगस्ट २०२० रोजी पोलीस महासंचालकांपुढं ठेवले. त्यांची गंभीर दखल घेत २६ आॅगस्टला पोलीस महासंचालकांनी यासंबंधातील एक अहवाल तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवत या प्रकरणी सीआयडी चौकशी आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. हा अहवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवण्यात आला होता. त्यावर पोलीस महासंचालकांनी ताबडतोब कारवाई करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला. परंतु २५ ऑगस्ट २०२० पासून आत्तापर्यंत काहीच कारवाई झाली नाही. हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही, उलट हे गृहमंत्र्यांकडेच का पाठवलं. मुख्यमंत्र्यांनीच या सगळ्यावर पांघरुण घातलंय, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पोलिसांच्या बदल्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात फोन टॅपिंगचा ६.३ जीबी इतका डेटा माझ्या हातात लागलेला आहे.  त्यामुळे फोन टॅपिंगचे आणि इतर सर्व सबळ पुरावे घेऊन दिल्लीला केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

(opposition leader devendra fadnavis alleged claim transfer racket in maharashtra police department)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा