Advertisement

“पवारांकडून देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न उघड”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणीवपूर्वक देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“पवारांकडून देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न उघड”
SHARES

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान अनेकांची भेट घेतली. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाणीवपूर्वक देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शरद पवार अनिल देशमुखांचा बचाव करत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर आढलेल्या स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना अटक केलेली आहे. याच दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी १५ फेब्रुवारीला सचिन वाझेंना आपल्या बंगल्यावर बोलावून घेऊन दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे निर्देश दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला. या सगळ्या प्रकाराची चौकशी सीबीआयने करावी या मागणीसाठी परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात देखील गेले आहेत. 

तरीही शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असून १५ ते २७ फेब्रुवारी या काळात देशमुख नागपूरमध्ये होम क्वारंटाईनमध्ये होते, असा दावा शरद पवार (sharad pawar) यांनी केला. तशी कागदपत्रंही दाखवली. 

हेही वाचा- कणाहिन ठाकरे सरकार बरखास्त करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी

प्रत्यक्षात मात्र अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला एका खासगी विमानाने मुंबईत आल्याचे पुरावे आहेत. पोलीस विभागाच्या दैनंदिन नोंदीनुसार १७ फेब्रुवारी रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील, अशी नोंद आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याची पोलिसांची नोंद आहे. अर्थात या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही. तरीही गृहमंत्री मुंबईला परतल्यानंतर क्वारंटाईनमध्ये नव्हते, याबाबत शरद पवारांना चुकीची माहिती पुरवण्यात आली आहे, असं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. 

त्यामुळे अनिल देशमुख यांना कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचं पितळ उघडं पडणारच आहे. भ्रष्ट गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी प्रमाणाबाहेर जरी खोटं रेटलं, तरी सत्य जनतेसमोर येणारच. अनिल देशमुखांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.

(sharad pawar should not back anil deshmukh over false information says devendra fadnavis)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा