Advertisement

सरकारने सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलं- देवेंद्र फडणवीस

तिन्ही पक्षाच्या राजकारणात महाराष्ट्राची जनता भरडली जात आहे. यामुळे जनतेत प्रचंड प्रमाणात रोष आहे, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सरकारने सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचं नुकसान केलं- देवेंद्र फडणवीस
SHARES

सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत कुठलाही ताळमेळ नाही. यामुळे तिन्ही पक्षाच्या राजकारणात महाराष्ट्राची जनता भरडली जात आहे. यामुळे जनतेत प्रचंड प्रमाणात रोष आहे, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला. 

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर खरपूस टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष होत आलं आहे. परंतु अजूनही सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ दिसून येत नाहीय. उलट तिन्ही पक्ष कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत. या राजकारणात महाराष्ट्राची जनता भरडली जात आहे. फक्त कामांना स्थगिती देणं एवढंच या सरकारचं धोरण आहे. अनेक प्रश्नांच्या बाबतीत राज्य सरकारची निष्क्रियता दिसून आली आहे.

हेही वाचा- अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा, मराठा आरक्षणाशिवाय होणार प्रवेश

अशा या निष्क्रिय सरकारविरूद्ध जनतेत मोठा रोष आहे. नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही ठिकाणी तर पंचनामेही झालेले नाहीत. शेतकर्‍यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांच्या घोळामुळे मोठा असंतोष आहे. आमच्या एकाही आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही, एकाही पत्राला उत्तर नाही, कधी कोणती बैठक घेत नाही. या सरकारला प्रश्न सोडवायचे नाहीत. अशावेळी जनतेचे दु:ख मांडले गेले पाहिजेत आणि तेच आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून मांडतो आहोत. जनतेच्या मनातील रोष या निवडणुकीतून व्यक्त होईल, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्‍याच समाजातील विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान केलं जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिलं नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला क्रमांक १ वर आणले. आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारं काही समजतं. शिवाय, शिवसेना (shiv sena) म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये. आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही.

पण, हेही तितकंच खरं आहे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

(opposition leader devendra fadnavis criticised maha vikas aghadi government over maratha reservation and students admission)

हेही वाचा- ‘हे’ बेईमानीनं आलेलं सरकार- देवेंद्र फडणवीस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा