Advertisement

‘हे’ बेईमानीनं आलेलं सरकार- देवेंद्र फडणवीस

त्यांनी कितीही स्वप्न बघू देत. पण हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे. हे त्यांनाही ठाऊक आहे, असं मुख्यमंत्र्यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘हे’ बेईमानीनं आलेलं सरकार- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्यातील सरकार अजून चार वर्षे काय २० वर्षे चालेल, असं वक्तव्य विरोधक भाजपला टोमणा मारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलं आहे. या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी कितीही स्वप्न बघू देत. पण हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे. हे त्यांनाही ठाऊक आहे, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.

विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पहाटेच्या शपथविधीबाबत विचारलं, यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता जेव्हा सरकार बघायला मिळेल, तेव्हा ते पहाटेचं सरकार नसेल. तर योग्य वेळी सत्तेत येणारं सरकार पाहायला मिळेल. या अल्पकालीन सरकारवर एक पुस्तक लिहिणार असल्याची माहिती देखील फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिली.

तर राज्यातील सरकार अजून चार वर्षे काय २० वर्षे चालेल, असं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, त्यांनी कितीही स्वप्न बघू देत. पण त्यांना हे ठाऊक आहे की, जनतेने त्यांना निवडून दिलेले नव्हतं. हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे.

हेही वाचा - पहाटेच्या धक्क्यातून ‘ते’ अजून सावरलेले नाहीत- संजय राऊत

महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सुटत नसल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी गेल्यावर्षी भल्या पहाटे शपथविधी उरकत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला होता. या पहाटेच्या शपथविधीला २३ नोव्हेंबर २०२० रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे. या अल्पजीवी सरकारवरून टीका करताना “ती पहाट नव्हती तो अंधकार होता. आम्हाला कोणताही धक्का बसला नव्हता. आमच्या सर्व स्मृती सुखदायक आहेत. त्या पहाटेच्या सुद्धा…पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. पहाटे पहाटे मला जाग आली…अजून ते झोपलेले नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. “पुन्हा ती पहाट येणार नाही, कधीच येणार नाही,” असाही विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना २३ नोव्हेंबरच्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी घेऊन राष्ट्रवादीचे काही आमदार फोडल्याचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डावपेच आखत अजित पवार यांचं मन वळवून पुन्हा एकदा त्यांना माघारी यायला भाग पाडलं होतं. त्यामुळे हे सरकार औटघटकेचं ठरलं. 

(opposition leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray lead maha vikas aghadi government)


संबंधित विषय
Advertisement