Advertisement

पहाटेच्या धक्क्यातून ‘ते’ अजून सावरलेले नाहीत- संजय राऊत

पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत, असं संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

पहाटेच्या धक्क्यातून ‘ते’ अजून सावरलेले नाहीत- संजय राऊत
SHARES

महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सुटत नसल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्यावर्षी भल्या पहाटे शपथविधी उरकत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला होता. या पहाटेच्या शपथविधीला २३ नोव्हेंबर २०२० रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे. हे सरकार अल्पजीवी ठरल्याने या शपथविधीवरून भाजप (bjp), खासकरून फडणवीसांना अधूनमधून टोमणे ऐकून घ्यावे लागतात. असाच टोमणा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मारला आहे. पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत, असं संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

“ती पहाट नव्हती तो अंधकार होता. आम्हाला कोणताही धक्का बसला नव्हता. आमच्या सर्व स्मृती सुखदायक आहेत. त्या पहाटेच्या सुद्धा…पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. पहाटे पहाटे मला जाग आली…अजून ते झोपलेले नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. “पुन्हा ती पहाट येणार नाही, कधीच येणार नाही,” असाही विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- मुंबई महापालिकेत बहुमत मिळवणारच, भाजपचा निर्धार

तर दुसऱ्या बाजूला, त्यांनी कितीही स्वप्न बघू देत. पण त्यांना हे ठाऊक आहे की, जनतेने त्यांना निवडून दिलेले नव्हतं. हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे. आता जेव्हा सरकार बघायला मिळेल, तेव्हा ते पहाटेचं सरकार नसेल. तर योग्य वेळी सत्तेत येणारं सरकार पाहायला मिळेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना (shiv sena), काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना २३ नोव्हेंबरच्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी घेऊन राष्ट्रवादीचे काही आमदार फोडल्याचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डावपेच आखत अजित पवार यांचं मन वळवून पुन्हा एकदा त्यांना माघारी यायला भाग पाडलं होतं. त्यामुळे हे सरकार औटघटकेचं ठरलं. 

(shiv sena mp sanjay raut criticised oath taking ceremony of devendra fadnavis and ajit pawar led government)

हेही वाचा- यंदा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण, अनुयायांना मज्जाव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा