Advertisement

हे शरजीलला संरक्षण देणारं सरकार, देवेंद्र फडणवीस यांची टीका

हे शरजीलचं सरकार आहे, शरजीलला संरक्षण देणारं सरकार आहे, अशी टीका करताना शरजीलला अटक करण्याची मागणी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनाच ताब्यात घेतलं जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

हे शरजीलला संरक्षण देणारं सरकार, देवेंद्र फडणवीस यांची टीका
SHARES

हे शरजीलचं सरकार आहे, शरजीलला संरक्षण देणारं सरकार आहे, अशी टीका करताना शरजीलला अटक करण्याची मागणी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनाच ताब्यात घेतलं जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला आहे. 

भाजपच्या मुंबईतील प्रदेश मुख्यालयात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रसारमाध्यमांनी शरजीलची अटक आणि सेलिब्रिटींच्या ट्विटवरील चौकशीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले, शरजीलला अटक केलं जात नाही, त्याला अटक का केलं नाही म्हणून भाजपच्या (bjp) उत्तर भारतीय आघाडीनं आंदोलन केलं. तर त्या पदाधिकाऱ्यांनाच घरात जाऊन ताब्यात घेण्यात आलं. त्यामुळे हे शरजीलचं सरकार आहे. त्याला संरक्षण देणारं सरकार आहे, असं आम्ही म्हणालो तर चुकलं काय? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

हेही वाचा- शरजीलला पळून जाण्यात ठाकरे सरकारची मदत, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांचं आणि ज्यांनी ही मागणी मंजूर केली, त्यांचं मानसिक संतुलन ठिक नाही. त्यांच्या मानसिक संतुलनाचीच चौकशी करण्याची खरी गरज आहे. भारताच्या सार्वभौमत्वाशी छेडछाड सहन केली जाणार नाही. भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही, असं म्हणणं चुकीचं असेल तर आपल्या सगळ्यांना सरकारने अटक करावं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुण्यात ३० जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी (sharjeel usmani) याने हिंदुत्वाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवण्यात आला. या वादग्रस्त भाषणाची व्हिडिओ क्लिप तपासून राज्याच्या गृहविभागाने शरजील विरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. मात्र गुन्ह्याची नोंद होऊनही शरजीलला अटक का केली जात नाही? असा सवाल भाजप नेत्यांकडून विचारण्यात येऊ लागला.

शरजीलच्या अटकेवरून सरकारवरील दबाव वाढल्यानंतर  शरजील बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये किंवा इतर कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी दिलं होतं. तरीही त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

(opposition leader devendra fadnavis criticized maharashtra government on sharjeel usmani comment)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा