Advertisement

31 मेपर्यंत रस्ते न झाल्यास प्रमुख अभियंत्याची चौकशी - रवी राजा


31 मेपर्यंत रस्ते न झाल्यास प्रमुख अभियंत्याची चौकशी - रवी राजा
SHARES

मुंबईतील रस्त्यांची कामं खडीअभावी रखडली होती. परंतु आता खडी उपलब्ध झाली असून, त्यानंतरही रस्त्यांची कामे 31 मेपर्यंत पूर्ण न झाल्यास याप्रकरणी रस्ते प्रमुख अभियंता यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. निविदेतील अटींनुसार खडी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची आहे. परंतु ही खडी कंत्राटदारांना उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी राजकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दराडे यांची भूमिका संदिग्ध असून, याप्रकरणी त्यांची चौकशी करावी, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

मुंबईतील 927 रस्त्यांची कामे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे सुरू असताना ठाण्यातील दगड खाणींवर पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून बंदी घालण्यात आल्यामुळे खडीअभावी रस्त्यांची कामे खोळंबली होती. परंतु याप्रकरणी संजय दराडे यांनी शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही खडी कंत्राटदारांना मिळवून देण्याचे काम केले आहे. मुळात कंत्राट दिल्यानंतर लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी आहे. परंतु, ही खडी मिळवण्यासाठी रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी प्रमुख भूमिका बजावली. आता खडी उपलब्ध झालेली असून, 31 मेपर्यंत सर्व कंत्राटदारांकडून कामे करून घेण्याचीही तेवढीच जबाबदारी ही संजय दराडे यांची आहे. जर 31 मेपर्यँत रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार दराडेच असतील असे स्पष्ट करत रवी राजा यांनी नियोजित वेळेत रस्त्यांची कामे पूर्ण न केल्याप्रकरणी संजय दराडे यांची चौकशी करण्याची मागणी आपली राहील, असा इशारा दिला आहे.


हेही वाचा

78 टक्के नालेसफाई पूर्ण, मुंबई महापालिकेचा दावा


नालेसफाईचा दावा पावसाळ्यात कळेलच -
मुंबईतील नालेसफाईचे काम हे 78 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. याचा समाचार घेत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हा दावा किती खरा आणि किती खोटा आहे, हे पहिल्याच पावसात कळेल, असा टोला लगावला आहे. नालेसफाईच्या कामांचा टक्केवारीचा आकडा हा कागदावरच आहे. प्रत्यक्षात नालेसफाईची कामेच योग्य गतीने झालेली नाहीत. खुद्द नालेसफाई झालेल्या विभागात अजूनही अशी कामे झालेली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा