SHARE

सत्ताधारी भाजपा-शिवसेना सरकार केवळ पैसे वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची कमी करत असून, या कृत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेनं खाली झुकल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.


उंची ७५.७ मीटर केली

विधानसभेत पुतळ्याच्या उंचीवरून विखे पाटील यांनी सरकारवर हल्ला चढवला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील १२१.२ मीटर उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याला मान्यता मिळाली होती. त्यामध्ये ८३.२ मीटर उंची महाराजांच्या पुतळ्याची तर ३८ मीटर तलवारीची उंची होती.  भाजप-शिवसेनेच्या सरकारने पुतळ्याची एकूण १२१.२ मीटर उंची तशीच ठेवली. मात्र खर्च कमी करण्यासाठी छत्रपतींच्या पुतळ्याची उंची ८३.२ मीटरवरून ७५.७ मीटर इतकी कमी केली. तर तलवारीची उंची ३८ मीटरवरून ४५.५ मीटरपर्यंत वाढविली. तसेच पुतळ्याचा चौथरा ९६.२ मीटरवरून ८७.४ मीटरपर्यंत कमी करण्यात आला आहे.

सरकारनं स्पष्टीकरण द्यावं

यापूर्वीही सभागृहात सरकारने ५६ इंचांची छाती करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली जाणार नाही, असं सांगितलं होतं. तरीही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने छत्रपतींच्या स्मारकाची उंची कमी करण्यासाठी मान्यता दिल्याचं सांगून विखे पाटील यांनी यासंदर्भात सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.हेही वाचा -

आमदारांच्या प्रवास भत्त्यात तिप्पट वाढ

मुंबई-गोवा महामार्ग १५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा - चंद्रकांत पाटील 

संबंधित विषय
ताज्या बातम्या