अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून विरोधीपक्षांकडून सरकारचा निषेध

 Mumbai
अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून विरोधीपक्षांकडून सरकारचा निषेध
Mumbai  -  

मुंबई - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या बाहेर अर्थसंकल्पाच्या प्रतीची होळी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली तेव्हा विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी कर्जमाफीसाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे देखील कामकाज होऊ शकले नाही. तरीही राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या बाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून होळी केली. तर हा अर्थसंकल्प जनतेच्या अपेक्षाभंग करणारा असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध दर्शवला, तसेच हा अर्थसंकल्प राज्याला मागे घेऊन जाणारा आणि राज्याच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. त्यामुळे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अर्थसंकल्पाच्या प्रती जाळण्यात आल्या. तर विरोधकांनी अशा प्रकारे वागून शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अर्थसंकल्पाच्या प्रती जाळण्याचा जो कार्यक्रम केला गेला, तो प्रकार अत्यंत लाजिरवाणा आहे, आज जनतेच्या ज्या समस्या आहेत, त्या विरोधी पक्षांमुळे निर्माण झाल्या आहेत असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Loading Comments