Advertisement

पालिका रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूनंतर चौकशीचे आदेश

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

पालिका रुग्णालयातील बालकांच्या मृत्यूनंतर चौकशीचे आदेश
SHARES

भांडुप इथल्या महानगरपालिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसुतिगृहामध्ये ४ दिवसात चार बाळांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त करत गदारोळ केला.

आता या प्रकरणाशी संबंधित अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे मेडिकल अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

सेफ्टीक इन्फेक्शनमुळे या मुलांचा मृत्यू झाला असल्याचा रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळवण्यात आलं होतं. आता रुग्णालयात आणखी तीन बाळ आहेत त्यांनाही असंच इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बोलताना म्हटलं की, महानगरपालिकेमध्ये असा प्रकार होत असताना का लक्ष दिलं नाही? दिवसा ढवळ्या हा खून झाला आहे. तात्काळ कारवाई करा. आणखी किती बालकांचा मृत्यू होणार आहे, अशा शब्दात फडणवीसांनी संताप व्यक्त केला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यानं या विषयावर एकत्र यावं आणि चर्चा करावी. हा गंभीर विषय आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सेफ्टीक शॉकमुळे ही घटना घडली आहे. चार बालकांचा मृत्यू झाला आहे आणि एक बालक गंभीर आहे. तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे.

यानंतरही काही निर्णय होत नसल्यानं विरोधकांनी गदारोळ केल्यानं काही वेळ सभागृह स्थगित करण्यात आलं. फडणवीस यांनी नंतर म्हटलं की, या बालकांच्या मृत्यूला जे जबाबदार असेल त्यांना तात्काळ निलंबित करा. हा गंभीर विषय आहे. मंत्री महोदय यांनी उभं राहून कारवाई करण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली.



हेही वाचा

सावित्रीबाई फुले प्रसूती रुग्णालयात ३ दिवसांत ४ अर्भकांचा मृत्यू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा