Advertisement

धक्कादायक! विधानभवनातील अग्निशमन यंत्रेच कालबाह्य

विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी या गंभीर प्रकाराकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. ते म्हणाले की, ''संपूर्ण विधानभवनात अनेक ठिकाणी मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे आहेत. माझ्या दालनात देखील २० नोव्हेंबर २०१७ रोजी मुदत संपलेले उपकरण लागलेली आहेत.

धक्कादायक! विधानभवनातील अग्निशमन यंत्रेच कालबाह्य
SHARES

राज्याच्या विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असून, माझ्या दालनासह अनेक ठिकाणी रिफिलची मुदत संपलेली उपकरणे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सभागृहात दिली.


मुदत संपलेली यंत्रे

विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी या गंभीर प्रकाराकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. ते म्हणाले की, ''संपूर्ण विधानभवनात अनेक ठिकाणी मुदत संपलेली अग्निशमन यंत्रे आहेत. माझ्या दालनात देखील २० नोव्हेंबर २०१७ रोजी मुदत संपलेेेली उपकरणे लागलेली आहेत.


सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक

दुर्दैवाने एखादी आगीसारखी घटना घडली, तर शेवटच्या क्षणी काय करायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या मुद्यावर तालिका सभापतींनी सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याची घोषणा केली.

खरं तर मुंबईतील कमला मिलच्या आग प्रकरणानंतर शहरातील सर्व महत्त्वाच्या आस्थापना आणि शासकीय ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अत्यावश्यक करणं आणि त्याचं नियमन करणं हे महत्त्वाचं काम सरकारकडून हाती घेणं अपेक्षित होतं. मात्र इथे विधानभवनातील अग्निशमन यंत्रणेचा फज्जा उडाल्याचं पहायला मिळालं आहे.



हेही वाचा-

हेरगिरीविरोधात विखे पाटीलांची राज्यपालांकडे तक्रार

मोपलवारांची नियुक्ती रद्द करा- विखे पाटील



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा