Advertisement

मोपलवारांची नियुक्ती रद्द करा- विखे पाटील


मोपलवारांची नियुक्ती रद्द करा- विखे पाटील
SHARES

रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संस्थापक पदावर वादग्रस्त सनदी अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांची फेरनियुक्ती कशी करण्यात आली? असा प्रश्न विचारत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला. तसंच मोपलवार यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.


बुलेट ट्रेनच्या गतीने क्लिनचीट

मोपलवार यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप असताना पुन्हा त्यांची त्याच पदावर नियुक्ती कशी करण्यात आली? एकनाथ खडसेंचा अहवाल अजून समोर येत नाही. मात्र या अधिकाऱ्याला बुलेट ट्रेनच्या गतीने कशी काय क्लीन चीट मिळते? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.


चौकशी समितीचा अहवाल कुठे?

चौकशी समितीचा अहवाल सभागृहात पटलावर ठेवण्यात आला नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. बॉलिवूडचा नट आणून आवाज काढण्यात आला, असा दावा चौकशी समितीसमोर करण्यात आला. मात्र, ध्वनिफितीतून मिळालेल्या माहितीत या अधिकाऱ्याची किती मालमत्ता आहे, त्याने ती कशी कमावली याची चौकशी तरी केलीय का? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.



हेही वाचा-

'समृद्धी'साठीच मोपलवारांना एक वर्षांची मुदतवाढ

हकालपट्टी झालेले राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा