Advertisement

हेरगिरीविरोधात विखे पाटीलांची राज्यपालांकडे तक्रार


हेरगिरीविरोधात विखे पाटीलांची राज्यपालांकडे तक्रार
SHARES

सरकार आपल्यावर हेरगिरी करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणाची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसंच गृहखात्याविरूद्ध चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.


काय आहे प्रकरण?

गेल्या गुरूवारी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेचे कर्मचारी अनधिकृतपणे माहिती घेत असल्याचं तसेच पत्रकारांची छायाचित्रे काढत असल्याचं दिसून आलं होतं.


पत्राद्वारे काय मागणी?

हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. पोलिसांनी विधानसभा विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानी विनाअनुमती प्रवेश करणं, पत्रकारांची छायाचित्रे काढणं, हा प्रकार अत्यंत संतापजनक, निषेधार्ह आणि घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलभूत हक्कांचा भंग करणारा आहे, असं विखे पाटील यांनी आपल्या पत्रात लिहिलं अाहे.

यातून सरकारचा संविधानावर व लोकशाहीवर विश्वास आहे की नाही, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अशा लोकशाहीविरोधी प्रकारासंदर्भात राज्यपालांकडे दाद मागावी लागते, हे अत्यंत क्लेषदायक असल्याचंही विखे पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.



हेही वाचा-

'संविधान बचाव'साठी बांधणार समविचारी पक्षाची मोट-शरद पवार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा