Advertisement

पालघरमधील हत्या माणुसकीला काळीमा फासणारी-अजित पवार

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा इथं झालेली घटना (Palghar mob lynching) माणुसकीला काळीमा फासणारी, निषेधार्ह आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पालघरमधील हत्या माणुसकीला काळीमा फासणारी-अजित पवार
SHARES

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा इथं झालेली घटना (Palghar mob lynching) माणुसकीला काळीमा फासणारी, निषेधार्ह आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी  सुरु झाली असून शंभरहून अधिक आरोपींना अटक केली आहे. सर्व दोषींना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा नक्की होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी व्यक्त केला. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत जात-पात, भाषा-प्रांत, धर्म-पंथ विसरुन एकजूट होऊन साथ देण्याची गरज आहे. कोरोनाचा लढा हा मानवतेच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. तो संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद-विसंवाद टाळला पाहिजे, असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं. 

हेही वाचा - महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? पालघर हत्या प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल

पालघरच्या घटनेवरून देशभरातून महाविकास आघाडी सरकारवर (maha vikas aghadi government) टीका केली जात आहे. खासकरून या हत्याकांडामुळे भाजपच्या (bjp) हातात आयतं कोलीत मिळालं आहे. पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसंच राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून केली आहे.

पालघरच्या गडचिंचले गावातील हत्ये प्रकरणी आतापर्यंत १०५ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला धार्मिक रंग देऊ नका, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

काय आहे प्रकरण? 

गुरूवार मध्यरात्री दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. ही घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले इथं घडली होती.  

हेही वाचा - माॅब लिंचिंगची घटना धार्मिक नाही, आग भडकवण्याचा प्रयत्न करू नका- उद्धव ठाकरे

या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरीही होते. या सर्वांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने शांत होण्याऐवजी पोलिसांच्या गाडीवरही हल्ला करत दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा