Advertisement

अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी १० कोटींचा निधी मंजूर


अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी १० कोटींचा निधी मंजूर
SHARES

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या गणवेशासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण, आदिवासी तसेच नागरी क्षेत्रातील ५५३ प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविका यांना २०१७-१८ या आर्थिक वर्षातील गणवेशासाठी १०.६८ कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले.


निधी वितरणास मान्यता

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली. निधीचे वितरण तातडीने करावं, असे आदेश त्यांनी ‘आयसीडीएस’च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा निधी अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.


लाभ कुणाला?

राज्यातील एकूण ९५ हजार ९२८ अंगणवाडी सेविका, ९२ हजार ३६० अंगणवाडी मदतनीस व ११ हजार ६४ मिनी अंगणवाडी सेविकांना याचा लाभ मिळणार आहे. अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना या निधीमधून स्वत: गणवेश खरेदी करण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांनी दिली.



हेही वाचा-

अंगणवाडी सेविकांचे मानधन आता 6 हजार 500 रुपये

तीन वर्षांची पिपाणी वाजवून उपयोग काय?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा