सगळ्याच पक्षांमध्ये गुंडाराज

    मुंबई  -  

    मुंबई - महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अगदी शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सगळीकडेच झाडल्या जात आहेत. आता तर अगदी आमच्यापेक्षा तुमच्या पक्षात कसे गुंड जास्त आहेत, हे दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. त्याचवेळी या गुंडाचे समर्थन करताना प्रत्येक पक्षातील राजकीय नेते हे आमच्या उमेदवारावर राजकीय स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे कारण पुढे करत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदान करणाऱ्या लोकांना नेमके काय वाटतेय हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाइव्ह’ने केला. त्यावेळी जवळपास सर्वच लोकांनी एका सुरात सगळ्याच पक्षात गुंड असल्याची प्रतिक्रया दिली. पण त्याचवेळी त्यांनी निवडूण येणाऱ्या नगरसेवकांनी लोकांची कामे प्रामाणिकपणे करावीत अशी अपेक्षाही व्यक्त केली.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.