शरद पवारांच्या सभेने राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला

 Mumbai
शरद पवारांच्या सभेने राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला

मानखुर्द​ - महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर शनिवारी राष्ट्रवादीने मुंबईत पहिलीच सभा मानखुर्द पीएमजीपी कॉलनी येथे घेतली. यामध्ये शिवसेनेसह भाजपावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली. मोदी यांनी निवडणुकांआधी सर्व काळा पैसा बाहेर काढून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख भरणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र स्वित्झलँडला जाऊन मोदींच्या हाती काहीही न लागल्याने त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा काहीही फायदा नागरिकांना झाला नाही. उलट नागरिकांना दिवस दिवसभर बँकेच्या रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागल्याचे शरद पवारांनी सांगितले. या सभेला खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सचिन अहिर, नवाब मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments