Advertisement

अटी मान्य केल्यानं विरोध मागे - राज


अटी मान्य केल्यानं विरोध मागे - राज
SHARES

मुंबई - करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या प्रदर्शनातली सगळी विघ्नं अखेर दूर झाली आहेत. दिग्दर्शक करण जोहर आणि मुकेश भट्ट यांनी दिलेल्या ठोस आश्वासनांमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन आता रोखणार नाही, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञाला सिनेमात घेणार नाही, असं आश्वासनही देण्यात आलंय. पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेले जे चित्रपट अखेरच्या टप्प्यात आहेत, त्यांच्या निर्मात्यांकडून सैनिक कल्याणनिधीत प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपये दिले जावे, सिनेमा सुरू होण्याआधी देशासाठी हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली जावी या सर्व अटी निर्माते आणि दिग्दर्शकांनी मान्य केल्या, अशी माहिती राज यांनी या वेळी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement