Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

राज ठाकरेंनी मूर्तिकारांना दिला 'हा' धोक्याचा इशारा!

पेणमधील मूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली.

राज ठाकरेंनी मूर्तिकारांना दिला 'हा' धोक्याचा इशारा!
SHARES

पर्यावरणपूरक मूर्तींचा पर्याय शोधा अन्यथा त्याला परदेशी पर्याय उपलब्ध होतील आणि लोकं त्या पर्यायाकडे वळतील, असा धोक्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मूर्तिकारांना दिला. बुधवार ७ आॅक्टोबर २०२० रोजी पेणमधील मूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली. (pen idol makers and sculptors meet mns chief raj thackeray at dadar mumbai)

या भेटीत मूर्तीकारांनी केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातल्याने मूर्ती घडवणं कठीण जात असल्याची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. शिवाय प्लास्टर आॅफ पॅरिसवरील बंदी उठवण्यासाठी मध्यस्ती करण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली.

यावेळी मूर्तिकारांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात नद्या, तलाव, समुद्रांमध्ये प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं कारण या मूर्ती विरघळत नाहीत. मुंबईत गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन बघितलं, तर दादर चौपाटी, जुहू चौपाटी आणि गिरगाव चौपटीवर या सगळ्या मूर्ती विखुरलेल्या दिसतात. इतक्या श्रद्धेने घरी आणलेल्या, भक्तिभावे पुजलेल्या गणेशमूर्तीची विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जी विटंबना होते ती पाहवत नाही. त्यामुळे मूर्तिकारांना माझं आवाहन आहे की, तुम्हाला शाडू माती किंवा इतर पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याची गरज आहे.

हेही वाचा - हाथरस घटनेवर 'ते' गप्प का? राज ठाकरेंचा रोकठोक सवाल

फक्त मूर्ती विसर्जनामुळेच जलप्रदूषण होतं असं नाही, तर त्याला इतरही अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करू नका, असं कोणतंच सरकार तुम्हाला सांगू शकत नाही. गणेशोत्सव दरवर्षी येतच राहणार. परंतु लोकांनाही पर्यावरणपूरक मूर्तींची आवश्यकता आहे. म्हणूनच मी तुम्हाला एक धोक्याची पूर्वसूचना देऊन ठेवतो की, तुम्ही जर मूर्तींच्या बाबतीत पर्यावरणपूरक पर्याय समोर आणला नाहीत, तर त्याला परदेशी पर्याय उपलब्ध होईल. चीन किंवा इतर कुठल्याही देशातून प्रदूषण न होणाऱ्या पाण्यात पटकन विरघळणाऱ्या मूर्ती आणल्या जातील आणि लोकं त्या पर्यायांकडे वळतील. तेव्हा तुम्हाला काहीच करता येणार नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 

त्यामुळे केवळ शाडू मातीच नाही, तर इतर पर्यायांवरही विचार करा. त्यावर एकमताने तोडगा काढा. त्यानंतर मूर्तिकार प्रतिनिधी, पक्षातील सहकारी मिळून एक शिष्टमंडळ घेऊन सरकारच्या संबंधित खात्याला भेटा. मी स्वतः शासनाशी विसर्जनाच्या पर्यायी व्यवस्थांबद्दल, मूर्तिकार कारखानदारांच्या थकलेल्या कर्जाबद्दल बोलेन, असं आश्वासन राज ठाकरे यांनी मूर्तिकारांना दिलं. 

हेही वाचा - मनसे दणका! २४ तासांत मिळाला कोळी महिलांना न्याय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा