Advertisement

राज ठाकरेंच्या भेटीनंतर पेस्ट कंट्रोल आणि फवारणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लागला मार्गी

राज ठाकरे यांचे आभार मानन्यासाठी इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशच्या शिष्टमंडळाने कृष्णकुंज इथं राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर पेस्ट कंट्रोल आणि फवारणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लागला मार्गी
SHARES

राज्य सरकारनं कोरोना नियंत्रणासाठी कठोर निर्बंध लादले. यात केवळ अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आली. मात्र, अत्यावश्यक सेवांमध्ये पेस्ट कंट्रोल आणि फवारणी कर्मचाऱ्यांचा समावेश नसल्यानं या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं.

अखेर पेस्ट कंट्रोल असोसिएशनने राज ठाकरें (Raj Thackeray)ची भेट घेतली आणि त्यांचा प्रश्न सुटला. यासाठी राज ठाकरे यांचे आभार मानन्यासाठी इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशच्या शिष्टमंडळानं कृष्णकुंज इथं राज ठाकरे यांची भेट घेतली.

संचारबंदीच्या काळात पेस्ट कंट्रोल आणि औषध फवारणी करणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवेमध्ये प्रतिबंध करण्यात आले होते. आपत्कालीन सेवांमध्ये पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे या मागणी संदर्भात इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशच्या शिष्टमंडळानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

यावेळी राज ठाकरे यांनी असोसिएशनचा हा प्रश्न समजून घेतला. तसंच कोरोनाच्या काळात लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं निर्जंतूक फवारणी झाली पाहिजे. त्यासाठी पेस्ट कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवेमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे केली.

राज ठाकरे यांनी स्वतः संबंधित खात्याच्या मंत्र्यांना फोन करून पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवांमध्ये सामावून घ्यावे, अशी सूचना केली. त्यानंतर पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत सामावून घेण्यात आलंय. राज्य सरकारनं आपत्कालीन सेवामध्ये सामावून घेतल्यानं पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची आभार मानले.



हेही वाचा

ही पाटीलकी, देशमुखी नाही, हा संविधानाचा विजय, अॅड. गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण रद्द हे महाविकास आघाडी सरकारचं अपयश- चंद्रकांत पाटील

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा