Advertisement

राज्यातील विधानसभा निवडणुका पुढं ढकला, हायकोर्टात आली याचिका

सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूला जागा वाटपाच्या बैठकांनी जोर पकडलेला असतानाच विधानसभा निवडणुका पुढं ढकण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका पुढं ढकला, हायकोर्टात आली याचिका
SHARES

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूला जागा वाटपाच्या बैठकांनी जोर पकडलेला असतानाच विधानसभा निवडणुका पुढं ढकण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मानवतेच्या दृष्टीकोनातून निवडणुका पुढं ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.

कारण काय?

महाराष्ट्रातील ४० टक्के जनता पुराने बेहाल आणि दुष्काळाने त्रासलेली असताना अशा स्थितीत निवडणुका घेणं योग्य होणार नाही, त्यामुळे ही जनता स्थिरस्थावर होईपर्यंत राज्यातील विधानसभा निवडणुका पुढं ढकलण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

दिवाळीआधी प्रक्रिया पूर्ण

महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांची तारीख नक्की करण्यासाठी सध्या निवडणूक आयोगाकडून चाचपणी करण्यात येत आहे. लवकरच या तारखा जाहीर होऊ शकतात. २०१४ मध्ये २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणात निवणुकांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. तर १५ आॅक्टोबरला मतदान होऊन १९ आॅक्टोबरला निकाल लागले होते. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान निवडणुकीची प्रक्रिया पार पडली होती.

यंदा दिवाळीआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

दीक्षाभूमी ते चैत्यभूमीदरम्यान ईव्हीएमविरोधाचा एल्गार

‘वंचित’ला ‘आप’चा साथ?, अधिकृत घोषणेची लवकरच शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा